जाऊ द्या रावसाहेब... तुम्ही कितीही घसाफोड केलीत तरी ह्या बुवाबाजीची नशा आणि कैफ इतका तीव्र आहे की ह्या कोशातून बाहेर पडण्याची शक्यता मला तरी दिसत नाही.. सदर चर्चा सुरू करणाऱ्याच्या भल्या मोठ्या प्रतिसादातील ही वाक्ये पाहा..

"मला तर ही व्यथा वाटत नसून कुठेतरी एक प्रकारची आसुया किंवा जेलसी वाटतेय. कारण आपण येवढे विज्ञान वादी /ज्ञानी असुनही आपल्याला तो 'भाव' मिळत नाही . परंतु हे असे वेंगळ / अशिक्षीत / अज्ञानी लोक (हे मी विज्ञानवाद्यांच्या दृष्टीने बोलतोय) यांना मात्र समाजात येवढी प्रसिद्धी/मानसन्मान मिळतो. लोकादर मिळतोय. "

थोडक्यात - 'मासमॅनिया अद्याप कमी होत नाही, त्यांच्या नावाचा हँगओव्हर अद्याप उतरत नाही, हीच तर खरी व्यथा आहे!'