कलंत्रीसाहेब,
आपला उपक्रम स्तुत्य आहे.
एक विनंती, वर्तमानपत्रे, दूरदर्शन इत्यादी माध्यमांनी सुद्धा ह्यात पुढाकार घेऊन, परकीय शब्द वापरण्याचे कमीत कमी करावे. महाराष्ट्रातील सामाजिक कार्यक्रम - जाहीर सभा, राजकीय भाषणे या व अश्या इतर अनेक कार्यक्रमात परकीय शब्द वापरण्याचे कमीत कमी करावे.
सरकारी कामकाज, एखाद्या प्रकल्पाचे नामकरण इत्यादी गोष्टी मध्ये मराठी वर्चस्व असावे.