नेव्हिगेशन हा शब्द सामुद्रिक वाहतुकीच्या संदर्भात रूढ झालेला आहे असे वाटते. त्याला नौकानयन असा शब्द मराठीत प्रचलित आहे. विमानासाठी विमाननयन असे म्हणता येईल.

मार्गदर्शन, मार्गक्रमण, मार्गनियमन हे शब्दही येथे वापरून पाहावे.

सागरप्लवन म्हणजे नेव्हिगेटिंग थ्रू सी असा काहीसा अर्थ नेटावर मिळाला, तेव्हा आकाशप्लवन असे विमानाच्या नेव्हिगेशनला म्हणता येईल असे वाटते.