मिलिन्दराव,

एक तर तुम्ही शीर्षकात गजानन महाराजांचे नाव दिलेय, आणि लेखात मात्र साई बाबा आणि स्वामी समर्थ यांची काय शिकवण होती ते लिहिलेय. गजानन महाराज साफ विसरलात.
- हि निव्वळ तांत्रिक चुका काढताय राव तुम्ही... माझ्या मते ती नावे हि फक्त उदाहरणे होती. येथे मुख्य मुद्दा हा कोणत्याही महाराजांचे नाव हे नसून, त्यांची शिकवण हा आहे. (सचिनराव मी चूक असल्यास कृपया सांगा)

मिलिन्दराव, तुमच्या प्रमाणेच माझ्या सुद्धा वाचनात वरील महाराजांचे चरित्र नाही, त्यामुळे, शेगावच्या गजानन महाराजांविषयी तुमच्या वक्तव्याला मी काही बोलू इच्छीत नाही. 

तुम्ही तुमचा दृष्टिकोन स्वामी समर्थ, शिरडीचे साईबाबा, गजानन महाराज इत्यादीकरताच का मर्यादित ठेवता? तुम्हाला समजेल ती भाषा म्हणजे - 'थिंक आऊट साइड ऑफ द बॉक्स'

तुम्ही संत ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, रामदासस्वामी हे व अश्या अनेक थोर संतांचे कार्य, शिकवण पाहिली, तर तुमचे मत परिवर्तन होईल.