मिलिन्दराव,
मी ज्ञानेश्वरांना एक उत्कृष्ट विश्लेषक मानतो.
- म्हणजे, त्यांचे समाजकार्य, शिकवण इत्यादी गोष्टींकडे दुर्लक्ष केले? माझ्या मते, तुम्ही सूर्याला काजव्याची उपमा देऊन अपमान करत आहात.
 
तुकाराम महाराजांना एक उत्कृष्ट कवी.
- त्या नुसत्या कविता नव्हत्या, त्यांच्या जोवनाशी असलेले नाते होते. तुम्ही त्यांच्या मनुष्य जीवनाबद्दल जे विचार आहेत त्याकडे जाणून बुजून काणाडोळा करत आहात. त्यांची समाजाला शिकवण आहे, ती लक्षात घेत नाही.  तुम्ही समुद्रातून दोन चमचे पाणी काढून, आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करता आहात की, 'हा पाहा समुद्र ह्या चमच्यात आहे!'

ह्या लोकांचे श्रेष्ठत्व मान्य करण्यास मला त्यांनी चमत्कार करणे हे आवश्यक वाटत नाही.
-  कोणत्याही संतांचे श्रेष्ठत्व हे त्यांनी केलेल्या चमत्कार अवलंबून असत नाही. खरा संत आपल्या चमत्काराचा डिंगोरा पिटत नाही. फक्त खूप गरज असेल तेव्हाच त्याचा उपयोग (स्वार्थाकरता नव्हे) करतात.

संतांची कुठलीही शिकवण फक्त त्यांनी म्हटलेय म्हणून स्वीकारणे हीदेखील एक अंधश्रद्धाच.
मी सांगितलेल्या संतांनी, ज्ञानमार्गाचा मार्ग सुद्धा सांगितला आहे, पण हे तुम्हाला माहीत नसल्याने तुमचे वरील विधान आहे. म्हणतात ना 'हाफ नॉलेज ईज डेंजरस'

ज्ञानेश्वरांनी शूद्रांचा अयोग्य उल्लेख केलाय
उदाहरण द्या. तो तुमचा गैरसमज आहे. किंवा तुम्ही चुकीचा अर्थ लावलाय.
उलट, त्यांनी, सर्व प्राणिमात्रांना समान वागणूक मिळावी, सर्वांमध्ये सामंजस्य, मैत्री जडावी असेच पसायदानात परमेश्वराला मागणे मागितले आहे.

तुकारामांनी अश्लील भाषा वापरली म्हणून मीही वापरावी का?
उदाहरण द्या. हि भाषा जर वाम मार्गावर चालणाऱ्याला उद्देशून, त्याच्या हिताकरता असेल तर जरुर वापरावी. तुकाराम महाराजांच्याच भाषेत, 'भल्यासी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणावी काठी'

शिवाजी महाराजांनी अनेक लोकांचे मुडदे पाडले, म्हणून तुमच्या सारखे लोक त्यांना खुनी ठरवण्यास मागे पुढे पाहणार नाही.

रामदास बोहोल्यावरून पळून गेले, म्हणून त्यांच्या शिष्याने, शिवाजी महाराजांनी त्यांचे अंधानुकरण नाही केले, तर स्वतः: तब्बल आठ वेळा बोहोल्यावर चढले.
रामदासस्वामींनी 'बोहोल्यावरून पळून जा' अशी शिकवण दिली नाही, तेव्हा तुमच्या उक्तीवादात अर्थ उरत नसून तो, वादा करता वाद होतो.

मिलिन्दराव, माफ़ करा, पण तुमचे विचार भरकटलेले आसुन, चुकिच्या द्रुष्टीकोनातुन लिलेले आहेत.