तिच्या खुणेची चंद्रकोर ही गाली
वार नखाचा हलके करून गेली...
कळते हा बगिचा का फुलला माझा
काल म्हणे ती दारावरून गेली!
वावावा! हे शेर खास आवडले.
दुसऱ्या शेरातील "म्हटली" हा शब्द मात्र खटकला. "म्हणाली" या शब्दाचे (पुणेरी?) बोलीभाषेतील हे (किंवा "म्हणली" हे सुद्धा) भ्रष्ट रूप आहे, असे मला वाटते. कदाचित त्यामुळेच मला शब्द खटकला असावा.
एकूण गझल छान आहे. आवडली.
पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.