गझलेतील कल्पना आणि प्रवाह आवडला. मात्र पूर्ण गझलेत तीन अतिरिक्त मात्रांमुळे गेयतेच्या दृष्टीने अडखळायला होते आहे. पुढील सुचवण्या पटतात का ते पहावे -

"पुन्हा पुन्हा" ही रदीफ़ एक "पुन्हा" वगळून केवळ "पुन्हा" इतकीच ठेवावी व त्यानुसार बाकीचे ज़वळज़वळ सर्व मिसरे शेवटचा शब्द वगळून लिहावेत.

आठवे मला तिचे लाजणे पुन्हा
वेचुनी फुलांस ते माळणे पुन्हा

रोज हेच व्हायचे पाहताक्षणी
बोलणे कसेबसे हासणे पुन्हा

रोखले किती तरी याद यायची
(याद हा शब्द (मला) खटकला)
अन असेच रोज मी जागणे पुन्हा

या जगात सारखा त्रास सोसला 
किंवा या जगात सारखे सोसले किती (नुसतेच त्रास सोसला वृत्तांतात्मक वाटेल असे (मला) वाटले)
आसवे अशीच ही ("मग" मुळे गुणगुणताना अडखळायला होते आहे)ढाळणे पुन्हा

खेळते जिथे तिथे सावली तिची
का असे मला तिचे भासणे पुन्हा

या बदलांमुळे कोठेही अर्थबदल होतो आहे, असेही वाटत नाही. चूभूद्याघ्या.