नितीनराव,

आपल्यासारखी अंधश्रद्धाळु माणसे कधीही हार मानत नसल्यामुळे आणि आपल्याला साक्षात्कार(आपण समजता त्यांचे) झाल्यामुळे आपल्यात प्रचंड शक्ती संचारल्यामुळे,आपला नवस पुर्ण झाल्यामुळे आपले असे ठाम मत बनते की आपल जे जे चांगल झाल ते यांच्यामुळेचे झाले त्यामुळे आपल्यासारख्यांची त्यांच्यावरिल श्रद्धा  दृढ होते. त्यांच्यावरिल टिका आपल्याला सहन होत नाही. कोणि तुमच्या भक्तिविषयी किंवा त्यांच्याविषयी शंका उपस्थित केली की आपण सारखे निरनिराळे निरर्थक प्रश्न विचारत सुटतात. प्रसंगी हात उचलायला देखील कमी करत नाही.

त्यामुळे या लोकशाही राष्ट्रात कोणाला कोणाविषयी श्रद्धा ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्यामुळे कोणि काहीही बोलु शकत  नाही.

नितीनराव मला वाटत इथेच  अंनिसवाले चुकतात . त्यांना काय करायचय. ते कोण? कोणत्याही स्वरुपाच्या मानधनाशिवाय,वैयक्तिक लाभ नसताना अंनिसवाले समाजात  काम करत आहेत. उगाच त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली काय. आजच्या विज्ञान युगात प्रसारमाध्यम प्रभावी असल्यामूले आपली भुमिका जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यात गैर ते काय?

तरिही नितीनराव आपण योग्य.

आपला

कॉ.विकि