सुधा नरवणेंचे नाव ऐकले की मला थोडी भीतीच वाटायची - शाळेतल्या कडक बाईंची आठवण व्हायची.
पण त्यांनी एका दिवाळी अंकात छान आठवण सांगितली होती. त्यांचा मुलगा परराज्यातून (कोणत्या ते लक्षात नाही) महाराष्ट्रात येत असतो. खूप दिवसात त्याचा मराठीशी संबंध आलेला नसतो. रेल्वे सकाळी सात वाजता महाराष्ट्रामध्येच येत असते आणि कुठल्या तरी स्टेशनवर थांबते. हा चहाच्या टपरीवर चहा घ्यायला जातो, पहिला घोट घेणार तेवढ्यात रेडिओवर आवाज येतो 'सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे......' त्याला तिथेच आई भेटल्याचा आनंद होतो........