आपला उपक्रम स्तुत्यच आहे !
मनोगतावरही असे अनेक प्रयत्न सर्वसाक्षी नी केले होते.
परंतु जोवर आपण हे शब्द आपल्या बोली भाषेत रुजवत नाही तोवर त्याला अर्थच राहणार नाही.
भाषा वापरून वापरून बोथट होत नाही तर तिला धार येते. जोवर आपणच आपली मायबोली रोजच्या व्यवहारांत सढळपणे वापरणार नाही तोवर गैरमराठी तिच्याकडे दुर्लक्षच करतील असे माझे प्रामाणिक मत आहे.
तात्यांच्या प्रतिसादातली फक्त एकच गोष्ट पटली ती म्हणजे म.टा. /लोकसत्ता / सकाळ ह्या वर्तमानपत्रांतलीच भाषा 'मऱ्हाटी' राहिलेली नाही. ती हळूहळू इंग्रजाळत आहे. परंतु जोवर आपण आपल्या पुढच्या पिढ्यांच्या कानांत शुद्ध मराठी ओतत नाही तोवर त्यांच्यांतून मराठीचा पाठपुरावा करणारे पत्रकार तयारच होणार नाहीत.
तरी काही मदत लागल्यास कळवा... आम्ही हजर आहोतच.