आपली सूचना अगदी चांगली आहे. एखाद्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनप्रमाणे प्रत्येक चित्राबरोबर माहिती द्यायला मला आवडले असते, पण उपलब्ध साधनामधून ते तसे तयार करून मनोगतावर पाठवणे सध्या तरी मला जिकीरीचे वाटते. हे स्थळ मुख्यतः मराठी भाषेत मजकूर लिहिण्याच्या दृष्टीने बनवलेले आहे. यावर चित्र कसे पाठवावे यावरच अनेक वेळा लेख आलेले आहेत, त्याचप्रमाणे चित्र दिसत नसल्याच्या तक्रारीही बऱ्याच आहेत हे आपण पाहिलेच असेल.