मानले वृत्तांत मी न इथे लिहितो कधी
शब्द मज हवे तसे विडंबनी मांडतो
चांगल्या गझलांचे वृत्त न पाळता केलेले विडंबन आपण थोडे प्रयत्न करून वृत्तबद्ध करू शकाल. मात्राप्रेमींनी चू. भू. द्या. घ्या. असे लिहिण्याची गरज पडणार नाही. मूळ गझलेचा पहिला शेर
वाटते मला तुला म्हणून सांगतो
आजकाल मी जरा झोपेमध्ये बरळतो
ह्या दोन ओळीत
'गाल गाल गाल गाल गाल गाल गालगा' असा लघु गुरू क्रम आहे; जो आपल्या विडंबनात काही ठिकाणी कायम राहिला आहे, इतर जागी आपण वृत्तानुसार सुधारणा करू शकता. (गा-दीर्घ अक्षर, ल- लघु अक्षर)
मदत हवी असले तर जरूर व्य. नि ने शंका विचारा, शिवाय ज्यांची गझल आहे ते आपल्याला मदत करू शकतील.
मनोगतावर 'शोधा' मध्ये गण, लघु, गुरु, वृत्त याविषयी अधिक माहिती मिळेल.