एक बाई म्हणून ते तुमचा इतका आदर करतील की तोड
नाही.
पाकिस्तानातून भारतात नुकत्याच स्थायिक झालेल्या एका सिंधी व्यापाराला बोलताना त्याने हेच सांगितले. पाकिस्तानात सार्वजनिक ठिकाणी बाईमाणसाला मवालीगिरीचा त्रास होत नाही, असेच त्याने सांगितले.
आणि त्याहून अधिक आवडली इथली माणसं. त्यांना सतत भारताबद्दल आणखी जाणून
घ्यायचं असतं. आपण भारतात कधी आणि कसे गेलो, आपले कोण-कोण नातेवाईक तिथे
आहेत, हे सगळं भरभरून बोलायला ही माणसं कधी थकतच नाहीत.
माझ्या ओळखीचा एक पंजाबी गृहस्थ पाकिस्तानात जाऊन आल्यावर त्याला हेच वाटले. तो भारतातून आला आहे हे कळल्यावर अनेक उपाहारगृहाच्या मालकाने त्याच्याकडून पैसे घेतले नाही असे कितीदा झाले. जवळपास साऱ्यांचे असे अनुभव आहेत. हे असे असेपर्यंत पाकिस्तानवारी करण्याची इच्छा आहे.
एखादा पाकिस्तानी आपल्याला भेटला तर आपण त्याला असे वागवू काय? मला वाटते कदाचित नाही. ह्या दोन्ही गोष्टींचे आपण अनुकरण करायला हवे.