खरं तर हा लेख सुरू झाल्यावरच हा लेख डॉ. देवयाणी खोब्रागडे यांनी लिहिला असेल अशी शंका आली. यांना आधीच वाचलेले आहे.

यांचे वडील मुंबईला बेस्टमध्ये अधिकारी आहेत. वैद्यकीय पदवी घेऊन त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन फॉरेन सर्व्हिसेस घेतले.

सुरवातीला जर्मनीला होत्या त्याकाळात तेथे जर्मन भाषेचा अभ्यास केला. तेथेच त्याच्या पतीसोबत त्यांची ओळख झाली व विवाह सुद्धा त्याच दरम्यानचा. आता त्या पाकिस्तानात आहेत. लेख आवडला.

असे पाकिस्तानच्या लोकांच्या प्रेमळ वागणुकीचा दाखला देणारे  आणि काही लेख मी वाचून आहे. तेथील जनतेला भारताबद्दल खूप उत्सुकता आहे. आणि पाहुणे म्हणून गेल्यावर त्यांची खास बडदास्त असते असं ऐकून आहे.

कालच मुशरर्फ कराचीतील शिवमंदिरात गेले व तेथे भाषण केले असं वाचलं. ही बातमीसुद्धा खूप वेळेवर आली असं वाटतं.

कराचीच्या प्रेमात पडलेल्या डॉ.देवयानी यांना शुभेच्छा !

नीलकांत