चित्तोपंत,
गझल आवडली.. 'वळवळणारे', 'बाजूला पडले पुढे-पुढे पळणारे', मक्ता इ.
का उगा शोधिसी रानफुलांची वस्ती?
या शेरावरून कै. सुरेश भटांची - 'हा असा चंद्र' ही गझल आणि त्यातला
'चेहरा तो न तिथे, ती न फुलांची वस्ती,
राहिले कोण अता सांग झुरायासाठी' - हा शेर आठवला.
'वसंत' सुंदरच;
पण मतला थोडा खटकला.
चंदनापरी मज, माझ्यावर जळणारे
जातात देउनी काळिज दरवळणारे
यातलं 'काळिज' आणि पहिली ओळ यांमुळे थोडी ओढाताण वाटली.
- कुमार