अमित चितळे हा विषय सुरू करण्याखातर धन्यवाद!

प्रशासक महोदय, इथे सर्व चिकित्सेनंतर 'मनोगत' साठी सर्वांनी वापरावेत असे जे नियम स्वीकारल्या जातील ते एका स्वतंत्र 'संदर्भ' स्थळी सुरक्षित ठेवून कळी सरशी इच्छुकांस सापडतील असे ठेवावेत ही विनंती.

मी मराठी, पुढाकार घेऊन मार्गदर्शन केल्याखातर अभिनंदन.
'गुळचेपेपणा' असा काही शब्द अस्तित्वात नसावा असे वाटते.
तुम्हाला 'बोटचेपेपणा' किंवा 'गुळचटपणा' शब्द वापरायचा असावा असे वाटते. असो.

परभारतीय, तुमचा तिसरा मुद्दाही बरोबर आहे.

महेश, मराठीच्या अनेक बोली भाषा असून प्रत्येकीची अस्मिता स्वतंत्र आहे. तेंव्हा त्यांनी त्या 'बोली' त लिहीलेला मजकूर वाजवीच आहे. पण अशा लोकांना माझी नम्र विनंती आहे की सर्व लोकांच्या सोयीसाठी लिहीतील तेंव्हा त्यांनीही प्रमाणित भाषेचा वापर करावा.

प्रमाणित भाषेचे नियम प्रस्तुत करण्यास आणि यशस्वी वादविवादाने सिद्ध झाल्यावर 'संदर्भात' समाविष्ट करण्यास ह्या सदराचा उपयोग करावा अशी माझी सूचना आहे.