हवामानाच्या अभ्यासासाठी हलक्या हवेने भरलेला फुगा (बलून) हवेत सोडला जातो. तो हलकेपणामुळे वर उडतो पण वारा वाहील तिकडे वाहत जातो. सव्वाशे वर्षापूर्वी अशा मोठ्या फुग्यांना लोंबकळून उडण्याचे प्रयत्नसुद्धा झाले. पण त्या उडण्याला दिशा नव्हती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस जर्मन तंत्रज्ञांनी एका प्रचंड आकाराच्या विमानाच्या अनेक कप्प्यामध्ये हीलियमसारखा हलका वायू उडवून ते हवेत उडवायचे पण त्यालाच इंजिन जोडून त्याद्वारे हवे त्या दिशेला ढकलून न्यायचे अशा प्रकारचे यान बनवले. त्यामधे प्रवाशांना बसण्याची सोय तसेच नियंत्रणासाठी लागणारी सर्व व्यवस्था होती. हे विमान व्यवसायिक तसेच सैनिक अशा दोन्ही कामांसाठी यशस्वीपणे वापरले गेले. त्याचे एक चित्र खाली देण्याचा प्रयत्न करीत आहे.