ग्रामिणसाहेब, प्रयत्न जोरात फसला आहे हो!

गझलेत पहिल्या दोन ओळीत अंत्ययमक सारखे यायला हवे. म्हणजे

तिच्या डोळ्यात हरवून
डोळ्यांपलीकडे बघत होतो

तिच्या डोळ्यात हरवत होतो
डोळ्यांपलिकडे बघत होतो

असे केले तर त्यातल्या त्यात चालेल. म्हणजे शेवटी '.. अत होतो' असे यमक येईल. मग 'चाललो होतो', 'वहात होतो', 'होत होतो' या सगळ्या ओळी बदलाव्या लागतील.

शिवाय गझलेच्या प्रत्येक ओळीत (कुठले वृत्त पाळले नाही तरी) सारख्या मात्रा यायला हव्यात.

तिच्या  डोळ्यात    हरवत           होतो
१+२  +२+२+१  +१+१+१+१ +२+२  = १६

डोळ्यांपलिकडे          बघत       होतो
२+२+१+१+१+२  +१+१+१   +२+२  = १६

एव्हढे गणित जमवलेत की मग रचना थोडीफार गझलेसारखी दिसू लागेल. मनोगतावरील तुम्हाला आवडलेल्या रचना पहा, त्यात हे नियम पाळलेले दिसतील. शिवाय आणखीही काही करामती असतील. पण तो ऍडव्हान्सड कोर्स झाला.

सुचवण्यांबद्दल राग नसावा. तुम्ही उत्साहाने लिहिले आहे म्हणून सांगावेसे वाटले.