खर तर हे माझे व्यक्तिगत जिवन.
कधी कधी आवेश अथवा भावनिक कुचंबना ह्यामुळे लेखन केले जाते, हा लेख अथवा माझी कथा लिहण्यामागचा उद्देश हा फक्त हा होता की जर कोणी प्रेम करत असेल व देव ना करो की त्याला त्याचे प्रेम जर मिळाले नाही तर त्या मनुष्याने हार न मानता आपले जिवन जगावे, जिंकणे अथवा हारणॅ हे आपल्या हाती नाही आहे पण मित्रांनो हार मानू नका आपण कधी ना कधी तरी जिंकूच.
हा माझा विश्वास नाही आहे अनूभव आहे, वर जी कथा / अनूभव लिहला आहे त्या कहानीचा अजून अंत झालेला नाही आहे... पण काही कारणामूळे समजा अथवा नशीबामुळे ह्या कहानी मधून नायिका गायब झाली आहे पण नायक आहे अजून.
तेव्हा आपल्या साठी माझ्यासाठी ...... एक गाणॅ !
गाणे हिंदी आहे पण त्याची भावना खाली दिल्या प्रमाणे आहे,
सर्वानांच सर्व काही मिळते असे नाही,
कुणाला हे आकाश मिळत नाही,
तर कोणाला जमीन मिळत नाही.
तर मित्रांनो !
जग हे आपलेच आहे जगणे देखील आपल्यालाच आहे तेव्हा हार मानू नका.
राज जैन