पाचही भाग आवडले. कथेला वेग चांगला आहे. दीर्घकथा असूनही कुठेही कंटाळवाणी झालेली नाही. मात्र पाटलांच्या मुलांना सरसकट काळ्या आणि संतोषभाऊ-राजाभाऊ मंडळींना सरसकट पांढऱ्या रंगात रंगवले आहे असे वाटले. मोहिनी इंगळेला पाटलाची फूस पाहून तीही काळ्या रंगात रंगवली जाणार असे वाटले होते. मात्र तसे झाले नाही, हे आवडले. पुढील भागांबद्दल उत्सुकता आहे.