तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. हा लेख मी स्व-अनुभवातुन लिहला आहे. माधव यानीं म्हटले आहे अजुन परिस्थीती बदलली नाही. मी येथे सांगू ईच्छीतो त्या परीस्थीतीचा सामना करणारे विद्यार्थी देखिल लवकर बदलत नाहीत. विद्यार्थी आगदी शेवटच्या वर्षात प्रथम श्रेणी मिळवून पास होतील, पण त्यांना निकालपत्रक दिले जात नाही कारण त्यांचा प्रथम वर्षातील एखादा विषय सोडवायचा राहुन गेलेला असतो. अनेक वर्षे त्या विषयाची परीक्षा  विद्यार्थ्यांना द्यावी लागते.