या विषयावर आधारित शि.द.फडणीसांचे एक छान व्यंगचित्र आहे-त्याची आठवण झाली.'दाढी केल्यास केशकर्तन फुकट!' असा फलक लावलेल्या एका केशकर्तनालयाभोवती खूप माणसे जमलेली आहेत आणि  तुळतुळीत टक्कल असलेला एक माणूस त्या दुकानाकडे धावत सुटला आहे!!!!!!!!!

 प्रत्येकालाच अनेकदा येणाऱ्या अनुभवांशी जुळणारा हा लेख अगदी मनापासून आवडला.येथे जर्मनीमध्ये मात्र गेल्या दोनच वर्षात हा बदल घडला आहे.त्यापूर्वी सरकारी बंधनांमुळे वर्षातून 'हिवाळी' आणि 'उन्हाळी' असे केवळ दोनच सेल असायचे.