खालील माझे वैयक्तिक विचार आहेत.
निगडित - जवळचा म्हणून संबधित. लगट, चिकटणे या अर्थी मूळ असलेला हा शब्द आहे. असे शब्द बहुतेक त्या त्या भाषेचे स्वतःचे शब्द असावेत.
दळभद्री - भद्र या संस्कृत शब्दाचा अर्थ भाग्य, नशीब असा आहे. दरिद्री+भद्र असा दळभद्री शब्द तयार झाला असावा.
रटाळ - rut या इंग्रजी शब्दावरून रटाळ हा शब्द आला आहे. rut न्हणजे चाके एकाच मार्गातून गेल्यामुळे तयार झालेल्या रस्त्यावरच्या चाकोऱ्या होय. अशा रितीने एकच प्रकारचे, म्हणजेच अतिशय साधे सरळ काम हे रटाळ मानले आहे.
कंटाळा याची विशेष व्युत्पत्ती मला आठवत नाही. तो असाच स्वयंभू शब्द असावा.
भर - घोटाळा? वाटोळा? कटकट? फड? फडफडित? ठेच? छान?
आपला विषय निश्चितच मजेदार आहे. त्यावर इथे दुर्लक्ष कसे झाले याचे आश्चर्य वाटते.
कलोअ,
सुभाष