विज्ञान शाखेत अनेक गोष्टींना लॅटिन, ग्रीक, रोमन शब्दांवर आधारीत नावे दिली गेली आहेत. जसजसे नवीन शोध-संज्ञा बनत गेल्या तसतसे नवीन शब्दांची गरज पडू लागली. आधुनिक विज्ञान हे मुख्यतः पाश्चात्य शास्त्रज्ञांनी विकसित केलेले असल्याने ते त्यांच्या स्थानिक भाषांच्या मूळ भाषेचा आधार घेते झाले.

तसेच भारतीय लोकांनी भारतीय सीमेबाहेरून आलेल्या शब्दांना प्रतिशब्द शोधताना जुन्या आणि/किंवा समकालीन भारतीय भाषांचा आधार (अट्टहासाने का असेना) घेतला तर त्यात गैर ते काय?

===

जसे कोणाला बोजड संस्कृतोत्भव मराठी प्रतिशब्द नको वाटू शकतात तसे मराठी गाण्यांच्या मैफिलीत उगाचच "वाह, क्या बात है!" हेही काही जणांना तितकेच नकोसे वाटते. कोणतीही भाषा बोलावी, पण जी बोलतो ती शक्य तितकी शुद्ध बोलावी असे वाटते.

===

कारण ते समजण्यासाठी संस्कृतचे किमान जुजबी ज्ञान आवश्यक असते.

असहमत.

"आज माझा पगार झाला."
यातला "पगार" हा शब्द समजण्यासाठी स्पॅनिश, इटालीयन, (अरबी? फारसी?) या भाषांचे जुजबी ज्ञान आवश्यक आहे काय?

"मला भाकरी वाढ."
यातला भाकरी शब्द कळण्यासाठी कन्नड (की तमिळ?) चे जुजबी ज्ञान आवश्यक आहे का?

नवीन शब्द ऐकल्यावर सगळ्यांनाच बिचकायला होते; पण तोच शब्द रुळला की मग त्याचे वावडे वाटेनासे होते असे वाटते.

===

खरा प्रश्न
आपला तो बाब्या अन दुसऱ्याचा तो कार्टा?

हा आहे किंवा खरे तर

"पिकते तिथे विकत नाही"

हा आहे?

भारतभूमध्ये इतके काही पिकले आहे, पण ते इथेच विकले जात नाही, तर देशाबाहेर जाऊन काय विकणार?