सहीच हो शेर्पा ! कित्येक दिवसांनी मनोगतवर ट्रेकींगबद्दल काहीतरी हालचाल झालेली पाहून जबरदस्त आनंद झाला. आम्हीही मागच्याच आठवड्यात लोहगडाच्या छोट्या ट्रेकने सुरूवात केली आहे.. :-) आता दर महिन्याला एकेक गडदुर्ग सर करायचा बेत आहे.. बघूयात कसं जमतंय ते. यावेळेस रायगडाकडे कूच करणार आहोत ! :D
तुमचा हा वृत्तांत मस्तच पण पुढच्यावेळेस ( लवकरच कूच करा नविन ट्रेकसाठी ! ) अगदी सविस्तर कथन होऊन जाऊ द्या.
नुसतं वाचूनदेखील अंगावर काटा आला पण तरीही विचारल्याशिवाय रहावत नाहीये..जळवांचा फोटो बघायला मिळेल का? वासोटा सर करणे खूप अवघड आहे असं ऐकून आहे. तुमचा अनुभव काय म्हणतोय?