श्रद्धावंत व अश्रद्ध, दोघांनाही गुलाबराव महाराजांविषयी आदर वाटायला हरकत नसावी.
ते बालपणापासूनच अंध होते. पण प्रज्ञावंत व ज्ञानपिपासू असल्यामुळे केवळ ऐकून ऐकून, संस्कृतसह इतर भाषा त्यांनी आत्मसात केल्या, अनेक शास्त्रे शिकले. भरपूर काव्यरचना केली.
बुवाबाजीपेक्षा, भावपूर्ण श्रद्धेवर त्यांचा भर होता. ज्ञानेश्वरांविषयी विशेष आत्मीयता वाटत असल्यामुळे ते स्वत:ला ज्ञानेश्वरकन्या म्हणवून घेत असत.
त्यांच्या बद्दल चमत्कार, बुवाबाजी, मठ/भक्तपरंपरा, असे काही ऐकले नाही.
माहीतगारांनी त्यांचे सविस्तर चरित्र मनोगतावर मांडावे असे वाटते.

म्हणून रावांच्या भूमिकेत मला विसंगती दिसत नाही. मी संजोपरावांना पाठिंबा देतो.

कट्ट्याचे म्हणाल तर सध्या फक्त शुभेच्छा.

दिगम्भा