एका वृत्तपत्रात वाचले होते ते असे-

घरात सुखशांती नांदू दे , आर्थिक बरकत येण्यासाठी सत्यनारायणाची पुजा घातली जातो. पुजेच्या दुसऱ्या दिवशी घरातील शांती भंग झाली,आर्थिक नुकसान झाले. तर या पुजेचा आणि या घडलेल्या घटनांचा संबंध जोडला जात नाही. पुजा घालण्याऱ्या ब्राम्हणाला जाब विचारला जात नाही.विचारुन दिलेली दक्षिणा , शिधा इतर पुजेचे साहित्य परत घालणे किंवा परत चांगली पुजा घाल असा दम भरणे श्रद्धेच्या नियमात बसत नाही. यावरुनच प्लंबरने दुरुस्त केलेला नळ परत वाहु लागला किंवा मेकॅनिकने दुरुस्त केलेली एखादी वस्तु लगेच लगेच बिघडली तर त्याच्या पितरांसह सर्वांना शिव्यांची लाखोली वाहुन पैसे परत मागितले जातात किंवा  परत दुरुस्तिची मागणी केली जाते. पण पुजा घालुन घरातील शांति भंग झाली ,नुकसान झाली तेव्हा ब्राम्हणाला घरी जाऊन जाब विचारला जात नाही. पुजा घालतानाही पैसे मोजलेले असतात.

    जास्तित जास्त बोनस मिळावा यासाठी कामगार पुजा घालतात. त्याचेवेळी कमीतकमी बोनसवर वाटाघाटी मान्य व्हाव्यात यासाठी मालकाच्या घरीही हीच पुजा घातली जाते. या वाटाघाटीत मधल्यामध्ये आपली पोळी भाजणारा कामगार नेता आपले कामिशन जास्तित जास्त सुटावे यासाठी सत्यनारायणाला साकड घालुन बसलेला असतो.

 बहुतेक इमारतीत हल्ली तर पद्धतच पडलीय २६ जानेवारीला सत्यनारायण पुजा घालायची . हे पटते का?

संत गाडगे महाराज यांनि सत्यनारायण पुजेल भाकड कथा ठरवून विरोध केला केला होता. तसे धैर्य हल्ली कोणि दाखवत नाही.

आपला

कॉ.विकि