धन्यवाद भाष!मला वाटले की मी विचारलेले प्रश्न अगदीच निरुपयोगी असल्यामुळे कोणीही मनोगती उत्तर देऊ इच्छित नाही. दळभद्री व रटाळ याविषयी आपले विचार पटले.पण 'निगडीत' याचे मूळ मी शोधू इच्छिते.
तुम्ही म्हणता त्यापैकी 'वाटोळा' हा शब्द त्याच अर्थाच्या 'वर्तुल' या संस्कृत शब्दाचे तद्भव रूप आहे असे मला वाटते.बाकी शब्दांवर मात्र विचार करायला लागेल.कटकट आणि फडफडित हे 'ध्वन्याधारित' onomatopoeic असे शब्द असावेत का?