निगडित - जवळचा म्हणून संबधित.
असेच वाटते. निकट ह्या शब्दापासून व्युत्पत्ती झाली असावी.

दळभद्री ह्या शब्दात दळण्याशी भाग्याचा संबंध असावा काय? बरेचदा मूळ संस्कृत शब्दाचे इतका अपभ्रष्ट होतो की व्युत्पत्ती कठीण होते. उदाहरणार्थ प्रसाद आणि पसाय.

कंटाळ्याचा टाळण्याशी काही संबंध असावा काय?:)