प्रतिसादांबद्दल धन्यवाद-
स्त्रियांना घरातही विचित्र अनुभव येऊ शकतात हे कित्येक बातम्यांत आपण वाचले असेल. प्रियांक अगदी जवळच्या कुटुंबापैकी असूनही हा अनुभव यावा हे सुरेखाताईंना दु:खद असेलच !
लेखनातल्या छोट्या किंवा मोठ्या प्रसंगां मधून जे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करतो ते वाचकांपर्यंत पोहचले तर जास्त समाधान वाटेल.
काही वेळा असे प्रसंग ओळखीच्या स्त्रीवर कोणाच्या तरी वागण्याने तर काही वेळा अनोळखी स्त्रीवर शेऱ्यांनी येऊ शकतात हे ही नमूद करणे भाग पडतेय !
भाषण लांबलेय ह्याची कल्पना लेखनाच्या ओघात आली नाही; आपण नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद.