काही मनोगतींच्या सूचनेनुसार हा कट्टा दोन दिवसात विभागणे जरा अधिक सोयीचे दिसते. शनिवारच्या मैफिलीत शरीक होणारे शनिवारी सायंकाळी डेरेदाखल होतील. रविवारी येणारी मंडळी रविवारी सकाळी परस्पर पिरंगुटला येतील. पिरंगुट गाव सोडून थोडेसे पुढे आलो की उजव्या बाजूला ताथवडे - हिंजवडीकडे जाणारा फाटा आहे. तिथे लगेचच आर्यावर्त नावाची बंगल्यांची सोसायटी आहे. जागा निवांत आणि रम्य आहे. तिथेच हा कट्टा घ्यावा, असा विचार आहे. भोजन वगैरेची व्यवस्था बाहेर करता येईल. रविवारी दुपार - संध्याकाळपर्यंत परत निघता येईल.कृपया आपला सहभाग आणि प्रस्तावित कार्यक्रमात सूचना / सुधारणा कळवाव्यात.