........ सारे पर्याय उपसून, आपल्या मनाला प्रश्न पाडून घेऊन, शेवटी 'नेति नेति' अवस्थेतून आपला सामान्यपणा आणि उत्तरे न मिळणारे प्रश्न स्वीकारुन जगण्याची सुरुवात करणारा दत्तू जी. एं.नी अतिशय छान रेखाटला आहे.
ह्या, जी.एंच्या सुरुवातीच्या कथेत जरी शेवट असा थोडासा आशावादी वाटत असला, तरी त्यांच्या पुढील लिखाणांत, तसा आभास नाही. खरं तर इथेसुद्धा दत्तू सर्व काही स्वीकरून जगण्याची सुरुवात करत आहे, असे त्यांना अभिप्रेत असेल, असे मला तरी वाटले नाही. जे आहे ते अपरिहार्य आहे, हे दत्तूने थोडेसे हतबलपणेच मान्य केले आहे. त्यातल्या त्यात मग त्याचे मन कुठेतरी विसावा शोधते, पण त्यात एकप्रकारची अगतीकता जरूर आहे.
पुढे 'माणसे, अरभाट आणि चिल्लर' मधे, त्या प्राद्ध्यापकाला वृंदा नाबर खूप वर्षांनी दिसते, ती एकदम भकास अवस्थेत! कॉलेजांत असतांना ती मुलगी सुन्दर कविता म्हणायची. आता तिला सर्वांगावर कोड आले होते, आणी रात्रीच्या वेळी ती स्टेशनच्या प्लॅट्फ़ॉर्मवर उभी होती. प्राद्ध्यापकाने तिच्यापासून आपले तोंड लपवले. "If winter is here, spring is not far behind!" असं तिला सांगायाची सोय नव्हती! हाच तो नियतीचा अपरिहार्य खेळ, ज्याच्यापासून, सर्व कही माहित असूनदेखील माणसे भोगत रहातात!
....प्रदीप