छू आपण खूप छान शंका विचारली आहे. मलाही असे प्रश्न बऱ्याचदा पडतात. तडजोड करावी की खंबीर राहावे असे दोन्हीही युक्तिवाद समान वाटू लागतात. अश्या वेळेस निर्णय घेणे हे खूप कठीण जाते... माझ्या मते अश्या वेळेस एक छोटासा प्रयोग करून पाहावा.. उदा. (बीफ खावे/ न खावे/ खावे पण खोटे बोलावे) = (किती लोकांवर परिणाम होतो आहे,  पुन्हा खाल्ले तर आजी पुन्हा प्रायश्चित्त घेण्याची शक्यता,  बीफ खाण्याची आवड, बीफ खाणे टाळणे सहज शक्य आहे का? , इ.इ. व्हेरिएबल्स(प्रतिशब्द?) चा एकत्र परीणाम) (संख्याशास्त्राची ओळख असणाऱ्यांना 'रीग्रेशन ऍनालीसीस' माहीत असेल.. थोडक्यात व्यवहारातही असे 'रिग्रेशन ऍनॅलिसिस' करावे आणि निर्णय घ्यावेत) ह्यांवरून ठरवावे तडजोड करावी की खंबीर राहावे.

तडजोडी वरून आठवलेला जी.एं च्या कथेतला एक परिच्छेद इथे उद्धृत करत आहे -

'आयुष्यात अनेकदा तडजोडी निर्विकारपणे कराव्या लागतातच, व माणसाचे मर्यादित सामर्थ्य ध्यानात घेता आपण फारशी तक्रार करू नये. पण या तडजोडी जेथे आतडे गुंतलेले नाही अशा बाबतीत घडल्यास त्याचे सोयरसुतकही फारसे नसते. पण प्रत्येक इमानदार व्यक्तीच्या जीवनात एक लहानमोठा कोपरा असा असतो की त्याठिकाणी तो तडजोडीच्या मळकट, ओबडधोबड पावलांना प्रवेश देऊ इच्छीत नाही - निदान त्यांनी येऊ नये म्हणून त्याची अविरत धडपड असते. जी व्यक्ती हे इमान शेवटपर्यंत अनाघ्रात ठेवू शकते, तिला ( मग तिचे लौकिक यश काहीही असो ) मी अत्यंत भाग्यवान समजतो. याचे एक कारण म्हणजे अशा या जिव्हाळ्याच्या जागी तडजोड असहायपणे करावी लागली की सारे आयुष्यच शरमेने कळकून गेल्यासारखे होते. (नंतर ही शरमदेखील हळूहळू नाहीशी होऊन मन निबर होऊन बसते ही माणसाची खरी शोकांतिका)'