मी ही सर्व माहिती इकडुन- तिकडुन जमा केलेली आहे, त्यामुळे काही त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परन्तु आकडेवारीच्या क्लिष्ट जंगलात जाण्यापेक्षा काही मननीय विचार आले तर बरेच होईल या धारीष्ट्याने मी या विषयावर माझे मत मांडत आहे.
१. जर भारत-पाक एक झाले तर सुरक्षेवरचा बराच खर्च कमी होवु शकेल, अर्थात शुन्य होणार नाही हे मी पण मान्य करतो. ( कारण मग अफगाणीस्तान, इराण आपले शेजारी होतील).
२. समजा, एकीकरण झाले नाही तरी, दोन्ही देशांनी सामंजस्याचा विचार केला तरी किमान ५० % तरी खर्च कमी होईल, अथवा टप्प्याटप्प्याने कमी होवु शकेल.
३. हा पैसा दोन्ही देश शिक्षण, रस्त्याच्या प्रगती साठी वापरु शकतील. ( त्यातुन रोजगार निर्माण झाला तर दोन्ही देशाची डोकेफोड तितकीच थांबेल).
४. परकीय कर्ज सुध्दा फेडता येईल ते वेगळेच. ( आपल्या दोन्ही देशातील तणाव नैसर्गीक आहे की शस्त्रविक्री करणारे त्यात तेलपाणी टाकतात ते एक रामच जाणे.)
५. रेल्वे आणि पक्क्या सडका यांना पाकिस्तानमध्ये बराच वाव आहे. जशा या गोष्टींमध्ये विकास होत जाईल तस तसे इतरही ताणतणाव संपुष्टात येत जातील हे नक्की. आपल्या देशाच्या तत्रंज्ञाच्या बुध्दीमत्तेचा आणि अनुभवाचा पाकिस्तानाल उपयोग करुन घेता येईल.
६. लोकसंख्यावाढीचा दर किती असावा याची मला माहिती नाही, तरीही लोकशिक्षणाने यात सुधारणा करता येतील.
७. सर्वात महत्वाचे, दोन्ही देशात दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या प्रचंडच आहे, दर वर्षी १० % इतक्या लोकांचे जीवनमान नियोजनाच्या आणि योजनाबध्द कार्यक्रमाने सुधारता आले तर, पुढच्या १० वर्षात हे देश काही न करता जगाचे नेतृत्व करतील हेही नक्की.

माझ्या सारख्या सामान्य लोकांच्या विचारांना अपयश येईल असे समजुन, भारत देशाने आपला स्वार्थ म्हणुन तरी पाकिस्तानी जनतेसाठी बरेच कार्यक्रम आखले पाहिजे. जेणे करुन आपल्या विकासाच्या दिशा खुल्या होतील.

इतरही मनोगतींनी आपले विधायक विचार मांडावि हि विनंती.

द्वारकानाथ