- मला हा क्रॅश कोर्स करायचा आहे.
----- मला ही धावती शिकवणी करायची आहे (धावता आढावा च्या धर्तीवर धावती शिकवणी असा शब्द घेतला आहे. धावती मध्ये वरवर, पटकन लागणारी माहिती देणारा, फारसे खोलात जाऊन न शिकवणारी शिकवणी अपेक्षित असते.)
- उदयापासून मॉर्निंग वाकला जाणार आहे.
----- उद्यापासून पहाटफेरीला जाणार आहे. सकाळी फिरायला जाणार आहे हेही चांगले वाटते.
- सध्या मला फ्रेश वाटत नाही.
----- सध्या मला उत्साह/ही वाटत नाही.
- मॉर्निंग फ्लाईट पकडायची आहे.
सकाळीच/सकाळचे/पहाटेच/पहाटेचे विमान पकडायचे आहे.
- मस्त एन्जॉय करायचे आहे.
----- मस्त मजा/धमाल करायची आहे.
- पोस्टकार्ड पाठवले तरी चालेल.
----- पोस्टकार्डासाठी वेगळा मराठी शब्द तयार करावा/व्हावा असे मला वाटत नाही.
- थोडे ऍडजस्ट होईल का?
------ काही तडजोड होऊ शकेल का? सांभाळून घेता येईल का? हेही चांगले वाटले.
- सध्या काही प्रपोजल नाही, बघू या..
----- सध्या काही प्रस्ताव/विचार नाही, बघू या..
- मग एन्गेजमेंट कधी आहे?
------ मग साखरपुडा कधी?
- सध्या बरेच फास्ट लाईफ झाले आहे.
----- सध्या आयुष्य/जीवन/जगणे फार धकाधकीचे/धावपळीचे झाले आहे.