कथा चांगली आहे. प्रियांकच्या वागण्याने वेगळे वळण घेतले आहे. एकंदरीत कथेचा विषय आणि वेग आवडला. पात्रांच्या स्वभाव-वागण्यातील काळे-पांढरेपणा मात्र थोडा (विशेष नाही) खटकला.
अवांतर - कथेतील काही शब्द खटकतात. ते ग्रामीण बोलीतले म्हणून संवादांमध्ये आले तर खटकले नसते. मात्र ते संवादांबाहेर, वर्णनांमध्ये असल्याने खटकले. खाक नव्हे तर काख असा शब्द हवा. खाक म्हणजे कोळसा-राख. जळून खाक होण्यामधला खाक. मात्र तुम्हाला अपेक्षित शब्द काख असा आहे. तसेच आधीच्या एका भागामध्ये प्रार्थमीक शाळा असा विचित्र शब्द वाचला. तो एका ठिकाणी संवादामध्ये आहे. तेथे तो चालून जाईल, कारण तो उच्चारणारे पात्र ग्रामीण बोलते आहे. मात्र संवादा बाहेर तरी तो प्राथमिक (मि ऱ्हस्व) हवा.