लकी जीन्स अनलकी शर्ट!

[म.टा.  Wednesday, November 29, 2006 01:04:58 am]
संजय दत्त नेहमी कोर्टात निळा शर्ट व काहिसी फाटकी डेनिम जीन्स घालून येत असे. मात्र मंगळवारच्या फैसल्याच्या दिवशी त्याने शर्ट बदलला होता. निळयाच्याऐवजी त्याने लालसर चेक्सचा फूलशर्ट व फाटकी जीन्स घातली होती.तसेच त्याने कपाळाला मोठा टिळाही लावला होता. त्यामुळे त्याच्या लकी जीन्सने त्याला 'टाडा'तून मुक्त केले व अनलकी जीन्सने आर्म्स ऍक्टमध्ये अडकविले नाही ना, असा एक गंमतीशीर मुद्दा कोर्टाच्या आवारातील चचेर्त येत होता.