माझ्या लेखात दिलेले एअरोफॉइलचे चित्र हा हल्लीच्या विमानाच्या पंखाचा छेद (क्रॉस सेक्शन) आहे. आपल्याला वर उचलणारा जोर पाहिजे असल्याने तो हवेला खाली ढकलेल अशा पद्धतीने ठेवलेला असतो. फुगीर भाग वर व खोलगट भाग खाली करून तो उपडा ठेवला आहे असे म्हणता येईल. ही तुलना इथपर्यंतच. विमानाचा पंख तव्यासारखा गोल नसून लांबुळका असतो.