तांत्रिक विषयावरील सुंदर लेख वाचून विशेष आनंद झाला. मी मनोगत वाचनाच्या बाबतीत लेट लतीफ असल्याने प्रतिसाद देण्यात उशीर होत आहे. आता या मालिकेतील इतर लेख वाचीन.

एक छोटीसी शंका :  "क्यूबेक, कॅनडा येथील पूल हा ह्या प्रकारच्या कॅन्टेलिवर पुलाचे उदाहरण आहे." या वाक्याच्या खाली चित्रात दाखवलेला पूल कँटिलिवर वाटत नाही. ट्रसचे उदाहरण म्हणून हे चित्र थोडे वर दिल्यास गोंधळ होणार नाही.

 ट्रस, फ्लँज, वेब यासारख्या इंग्रजी शब्दांना आपण मराठी प्रतिशब्द शोधत बसण्यापेक्षा तेच वापरणे ठीक आहे, निदान थोड्या लोकांना तरी ते समजतील असे मला वाटते. भाषाशास्त्रज्ञांनी योग्य असे प्रतिशब्द तयार करून ते रूढ केल्यानंतर इतर लोकांनी वापरायला हरकत नाही.