अशा संकेतस्थळाचे रूप लवकरच 'केवळ ओळखीच्या लोकांना भेटायची/आपापल्या लोकांशी बोलायची जागा' असे होऊ लागते.

अगदी सहमत.

तसेच आपण आपली घसट व्यक्तिगत निरोपातून वाढवावी, दाखवावी हे उत्तम. प्रतिसादातून असलेली/नसलेली घनिष्टता डोकावू नये. 'मला बी तुमच्यात येऊ द्या की रं ?' असे नवागतांना, पाहुण्यांना वाटायला नको. इथले वातावरण त्यांना इथून दूर नेणारे (पुट ऑफ करणारे) आपलेसे वाटायले हवे. आणि इथे काही जणांची मक्तेदारी आहे असेही वाटायला नको. नव्या सदस्यांना प्रोत्साहन (पेट्रनायज़ेशन ह्या अर्थाने नाही. मराठीत काय म्हणायचे पेट्रनायज़ेशनला?) द्यायला हवे. थोडक्यात आपण शहाण्या मुलासारखे वागायला हवे:)



जर एखाद्या सदस्याचे असे लेखन वारंवार काढून टाकावे लागले किंवा संपादित केले जाऊनही योग्य तो बोध घेऊन लेखनपद्धतीत बदल करण्यात असमर्थता दिसली तर अशा सदस्याचे लेखन प्रकाशनपूर्व परीक्षणासाठी ठेवून घेण्याचा उपाय केला जातो. ह्या धोरणाचाही अनेक सदस्यांना फायदा झालेला आहे.

हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा.:):):) होहो.

चित्तरंजन