माधव,
लेख छान. विषयही अतिशय महत्त्वाचा आहे. संवाद साधायला कौशल्य लागते, अगदी खरे आहे. त्यात मितभाषी लोकांशी संवाद साधायचा असेल तर...
संवाद परिणामकारक होण्यासाठी समोरच्या व्यक्तिच्या आवडीनिवडीनुसार बोलावे. अनोळख्या व्यक्तिबरोबर आपण एखाद्या विषयावर संवाद सुरू केला आणि तिच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यास किंवा उडवाउडवीची उत्तरे आल्यास विषय बदलून पाहावा, नाहीतर काय पकाऊ माणूस आहे, असा शिक्का बसू शकतो.
प्रशासकांच्या लेखाचा संदर्भ खास आणि समर्पक.
श्रावणी