स्वाती, अंजू, सखी, माधवराव, तात्या, वरदा, नंदन, भास्कर, चित्तरंजन, वैशालीताई, चक्रपाणि, सर्किट, सुमीत, नरेंद्रकाका, हॅम्लेट, सचिन, मृदुला, मुकुल, अत्यानंद, खादाड बोका सर्वांच्या प्रतिसादांबद्दल आभारी आहे.

सुमीतः
तुझ्या मना प्रमाणे जंजिरा वर लेख लिहीत आहे. :) लवकरच प्रसिद्ध करेन.

वा! लिहिच. फोटो पण घाल. मध्यंतरी जंजिराचा एक एरिअल व्ह्यू पाहिला. अतिशय सुंदर. महाजालावर मिळाला तर लेखाला नक्की लाव.

मृदुला:
एव्हढ्या थरारक अनुभवानंतरही तुम्ही पुढचे दोन दिवस यथास्थित फिरलात हे वाचून कौतुक वाटले.

फार काही पर्याय नाहीत हो, असे घाबरून घरी बसलो तर कुठे जायला यायला नको अशी स्थिती होईल. वसंतात आठवड्यातील ३-४ दिवस असा वादळी पाऊस असतोच पूर्ण ओहायो व्हॅलीत.

चक्रपाणि:
नवीन गाडी कुठली घेतली, याची उत्सुकता आहे.

अरे, सध्या तीच आहे, ठोक्याचे भांडे. २००२ ची होती. फार जुनी नाही त्यामुळे १ वर्ष वापरूया हीच असे ठरवले, पुढच्या वर्षी नवी घेतली की कळवते. ;-) (सध्या हीच त्या डेन्ट्समुळे उन्हात मस्त चमकते.)

अत्यानंद:
अतिशय प्रत्ययकारी वर्णनाची आपली आजपर्यंतची परंपरा आपण अशाच तऱ्हेने जारी ठेवाल आणि भविष्यातही आम्हाला त्याचा अनुभव घडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

धन्यवाद. म्हणजे भविष्यातही मला आणखी वादळे जगायला हवीत. (ह. घ्या. या मध्य अमेरिकेत राहून हे अजीबात अशक्य नाही.) शेर आवडला, समर्पक आहे.

खादाड बोका:
मी नुकताच तुमच्या मध्य-पश्चिम भागात स्थलांतर केले आहे..ह्या टोर्नेडोंचा काही विशिष्ट कालावधी असतो का?

हो, अधिक करून मार्च ते जून मध्ये येतात. त्यानंतरही येतातच बरेचदा, जसे दोन आठवड्यांपूर्वी नॉर्थ कॅरोलायनाला आले होते. बाकीच्या महिन्यांत हिमवादळे होतात. या या आपले स्वागत आहे. :)

पुन्हा एकदा धन्यवाद!

प्रियाली