जयन्ता, , अनु, ,
अभिप्राया बद्दल आभार..
सर्किट,
अभिप्राय आणि सुचनां बद्दल आभार..माझा प्रयत्न चालू आहे. १०-१२ वर्ष कुठलेही नियम न पळता लिहायची सवय लागलीय, सुधारायला जरा त्रास होतोय, पण सर्व प्रेमळ मनोगती माझी ही खोड सुधारतील ह्याची माला खात्री आहे.. तो पर्यंत थोडे सांभाळून घ्यावे ही नम्र विनंती. अशाच सूचना देत राहावे..
प.पू.खोडसाळ,
अभिप्राय आणि सुचनां बद्दल आभार..मनोगतचा सभासद होण्या आधी मी पूर्वी कधीच विडंबन हा प्रकार हाताळला नव्हता. आपली विडंबने वाचून उत्साह आला आणि मी विडंबन लिहिण्याचे प्रयत्न करतो आहे. सर्किट म्हणतात तसे आपण माझे ही मानसगुरू आहात. कृपया चू.भू. माफ करवी. सूचना आणि मार्गदर्शन करत राहावे ही नम्र विनंती
(शिकाऊ) अनिरुद्ध अभ्यंकर.