भारत देशात बहुसंख्येने कोण आहे. हिंदु धर्म (त्यातील जाती,पोटजाती) . त्यांची देवालये. प्रत्येक देवाची दंतकथा . त्यामुळे त्या देवाच्या कथेला अनुसरुन श्रद्धा की अंधश्रद्धा हे ठरवायचे कसे. अंधश्रद्धा म्हणुन ठरवायला गेल्यास श्रद्धेचे कारण पुढे केले जाते.
अंधश्रद्धा ही धर्माशी निगडीत . तर श्रद्धा व्यक्तिशी
अंधश्रद्धा दैवी चमत्काराला जवळ करत असेल तर श्रद्धा ही त्या त्या व्यक्तिंचे (उदा.महात्मा फुले,महात्मा गांघी,इ.)विचार व त्या विचारांचे आचरण यांच्या जवळ असावयास हवी .
व्याख्या-
श्रद्धा -श्रद्धा आंधळी नसेल तर ती श्रद्धा अशी संबोधावी. हे ठरवायचे कसे.ठरवणे अवघड
अंधश्रद्धा- श्रद्धा आंधळी असेल तर ती अंधश्रद्धा अशी संबोधावी. हे ठरवायचे कसे. ठरवणे सोपे पण कसे ते सांगणे अतिशय अवघड.
नास्तिक होणे केव्हाही चांगले का?
श्रद्धा अंधश्रद्धा यांच्या फंदात न पडता रोजचा जो दिनक्रम आहे तो नित्यनेमाने पार पडणे हे केव्हाही चांगले. ना धर्म ना जात फक्त चांगला माणुस.
आपला
कॉ.विकि