माझ्या अनुदिनीवर आणि मनोगतावर कंबोडियाच्या इतिहासावर काही संक्षिप्त लेख आहेत जे मला विकिपीडियावर मोठे करून घालता येतील, घालण्याची तयारीही आहे; परंतु ते माझ्या अनुदिनीवरही असावेत अशी माझी इच्छा आहे. हे करणे शक्य आहे का?
- उत्तर आहे होय अगदी शक्य आहे. तुम्ही स्वतःच लिखाण इतर ठिकाणा वरून विकिपीडियावर आणू शकता. आणि त्याच वेळी तुमचं संबंधीत इतर ठिकाणच लिखाण तुम्हाला हव्या त्या स्वरूपात तुम्ही जतन करू शकता.
- फरक हा की विकिपीडियावरील लेखन घेतल की मुक्तस्रोतात जात.पण फायदा हा की विकिपीडियावरील कोणतंही मुक्तस्रोत लिखाण तुम्ही इतरत्रच स्वतःच्या लेखनात सहज समाविष्ट करू शकता.
- विकिपीडियावर संदर्भ देऊन केलेलं लेखन कमीत कमी बदललं जात,त्यामुळे संदर्भा करिताही तुमचं इतरत्रच लेखन तुम्ही वापरू शकता.
- अर्थात तुम्हीच तुमच्या शब्दात लिहिल्या प्रमाणे तुमचं विकिपीडिया वरील लिखाण बदललं जाऊ शकतं. : "वाचकांना लिखाण बदलण्याची पूर्ण मुभा आहे, माझी नाही :) विकिपीडियाची"
-विकिकर