मजा म्हणून आम्ही पंचिंग मशीनला होकायंत्राच्या धर्तीवर भोकायंत्र म्हणत असू. भोकायंत्र हा शब्द तसा वाईट नाही, भोकयंत्रही म्हणता येईल.
वाहतुकीच्या सिग्नलला सिग्नल असेच म्हणावे. सिग्नल म्हणजे संकेत हे बरोबर, पण संकेत म्हटल्यावर वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या दिव्याचा खांब नक्कीच डोळ्यासमोर येत नाही. फारतर वाहतुक दिवा म्हणावे. (वाहतुक संकेत म्हटले तर गाडी चालवताना पाळावयाचे अलिखित-लिखित नियम असा समज होईल, म्हणून ते टाळले.) वायरलेस सिग्नल ला बिनतारी संकेत म्हणता येईल.