टपालपत्र वा चिठ्ठी हे पर्याय फारसे आवडले नाहीत. टपालपत्र म्हणजे टपालाने आलेले पत्र. मग ते पोस्टकार्डावर, अंतर्देशिय पत्रावर, पाकिटातून कसेही येऊ शकते. चिठ्ठी ही पोस्टकार्डावर वा साध्या चिटोऱ्यावर, कुठेही लिहिली जाते. कमी ओळींचे पत्र म्हणजे चिठ्ठी. त्यामुळे चिठ्ठी = पोस्टकार्ड हे पटत नाही. पोस्टकार्ड म्हणजे विशिष्ट क्षेत्रफळाचा, विशिष्ट रंगाचा आणि पोस्टाचा किंमतीचा शिक्का आधीच मारलेला एक जाड कागद. त्याला पोस्टकार्डच म्हणावे असे मला वाटते.