हिरीरीने शब्द घासून व वेळ वाया घालवून आमचे काका मंदिरासमोर जाताना देवाकडे बघून थुंकणार आहेत का ? किंवा चर्च मध्ये जाऊन गीतापठण अध्याय १३वा म्हणणार आहेत का ? नाही ना ? मग त्यांच्यात असलेल्या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणावी का ?
हे सगळे वाचूनही अनिरुद्ध बापूंचे किंवा सत्य साईबाबांचे मठ बंद होणार आहेत का ? तात्या तंबाखू मळायचे व मी सिगारेटी फुंकायचे बंद करणार आहोत का ?
सत्यनारायणाच्या पुजा व मशीदीतले सुंते बंद होणार आहेत का ?
वास्तुशास्त्र नावाचे थोतांड, वास्तुशांती, चांगल्या मुहूर्तांवर कार/फ्रीज विकत घेणे, लग्नाचे मुहूर्त, बारसे, श्राद्ध, अग्निदाह, मूंडन, अशुभ कार्य बुधवारी करणे बंद होणार आहे का ?
हे सर्व सोडा..... आमचे हे विद्वान काका अमेरिकेत बसून भारतातल्या त्यांच्या नातेवाईकांना ह्या सर्व गोष्टींपासून परावृत्त करण्याचे काय व कसे प्रयत्न करीत आहेत ते त्यांच्या खुमासदार लेखनाने मनोगतींना समजू द्या की..... म्हणजे आम्हीही त्यांच्यासारखेच प्रतिसाद द्यायला मोकळे !
कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वत:च्या घरातून करावी अशी एक श्रद्धा/अंधश्रद्धा आहे. कळूच द्या की आमच्या काकांच्या प्रयत्नांचे फलित त्यांच्या स्वतःच्या घरात काय आहे ?
सत्यनारायणाच्या पुजा की हिरव्या नोटांची (डॉलर्सची) पुजा ?