कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वत:च्या घरातून करावी अशी एक श्रद्धा/अंधश्रद्धा आहे. 

ह्ये श्रद्धा/ अंधश्रद्धा म्हंजी नेमकी काय अजाबात कळना झालय बगा आता...वरच्या वाक्यात वापरल्याला 'श्रद्धा/ अंधश्रद्धा' ह्या सब्दाला आमी आदर्श ह्यो शब्द समजायचो.. म्हंजी -  कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वत:च्या घरातून करावी असा आदर्श असतुया.

तुमच्या म्हनन्यापरमान 'श्रद्धा/ अंधश्रद्धा'  ह्येचा वापर खालील ठिकानी बरुबर हाये का?

नेहमी खरं बोलावं अशी एक 'श्रद्धा/ अंधश्रद्धा'  हाये.

चोरी करु नये अशी एक 'श्रद्धा/ अंधश्रद्धा' हाये इ. इ.