निरुभाऊ तुम्ही परत एकदा निट वाचले नाही असे वाटतय. त्यामुळे करणार काय.
माझा नाईलाज आहे. तुम्हाला समोर बसवून परत वाचेन म्हणतो. (ह. घ्या.)
बर सांगा ही पुजा घालताना कशासाठी घातली जाते.
कुटंबाचे स्थैर्य, सुख-समृद्धी आणि अशा इतर अनेक गोष्टींसाठी.
आपला या पुजेला विरोध आहे कि नाही ते कळेल का?
माझा विरोध नाही.
का?
विरोध करायला त्याने काही तोटा होतो असे मला वाटत नाही.
मला हसू आले ते तुम्ही 'पुजा घालतानाही पैसे मोजलेले असतात.' असे म्हणालात त्याबद्दल. प्रत्यक्षात ते पैसे ब्राम्हणाला मोबदला म्हणून नव्हे तर दक्षिणा म्हणून दिलेले असतात. मुळात दक्षिणा म्हणून पैसेच द्यावेत असा नियम नाही. तो प्रघात नंतर पडला असावा. ही दक्षिणा ब्राह्मणाबद्दल कृतज्ञता, आदरभाव दर्शवण्याकरीता असते. दक्षिणा किती आणि काय द्यावी ह्यावर बहुदा काही बंधन नाही पण ती दक्षिणा देणाऱ्याने स्वत: कमावलेली/स्वत:च्या मालकीची असावी इतकेच. तसेच केवळ पुजा सांगणाऱ्यालाच नव्हे तर इतरही ब्राह्मणांनाही आमंत्रित करून त्यांना दक्षिणा देण्यात येते.
दुसरा मुद्दा 'पण पुजा घालुन घरातील शांति भंग झाली ,नुकसान झाली तेव्हा ब्राम्हणाला घरी जाऊन जाब विचारला जात नाही.' आता हे करण्यासाठी तुम्हाला प्रथम पौरोहित्याला सेवाक्षेत्रात अथवा व्यापारक्षेत्रात अंतर्भूत केले पाहिजे. ज्यायोगे तुम्हाला शासनमान्य ब्राह्मणाकडून रीतसर पावती घेता येईल. त्यावर तुम्ही कोणत्या सेवेसाठी किती पैसे मोजले किंवा किती माप सुख-शांतीसाठी किती पैसे मोजले ह्याची नोंद करावी लागेल (शिवाय त्यावर "खराब माल बदलून मिळणार नाही' अशा प्रकारची सूचना नको!). त्यानंतर जर त्याची सेवा असमाधानकारक असेल किंवा तुम्हाला मिळालेल्या सुख-शांतीत दोष असेल तर पावतीच्याआधारे तुम्ही त्या ब्राह्मणाविरुद्ध ग्राहक न्यायालयात दाद मागू शकाल.
वादाचे मुद्दे सोडल्यास, कुठल्याही धार्मिक कार्याकडे पहायची तुमची वृत्ती काय आहे त्यावर बरेच काही अवलंबून आहे. मंदिरात चार पैसे देऊन मला अमूक दे तमूक दे अशी तुमची मागणी असेल तर प्रश्नच मिटला....